Sunday, January 17, 2016

शाकाहारी प्राणी



शाकाहारी प्राणी माणसांचे मांस खायाला नकार देत जगतायत

त्यांना माणसाच्या अंगावरचे
रोज उगवणारे गवत चालतं
रोज उगवणारी झाडं चालतात
पण थेट माणूस खाणं पसंद नाही

त्यांना माहित आहे थेट माणूस खाणं
म्हणजे रोज उगवणारे गवत
आणि झाडं नाहीशी करणं

शाकाहारी प्राण्यांच्यात एक सामंजस्य आहे कि
मिळून मिसळून खाऊन
एकमेकाला आधार देत खाऊ



माणसाहारी  प्राणी
माणसं खातायत
आणि त्यांना माणसं खाऊन संपली कि काय खायचं
हा प्रश्न पडत नाहीये

त्यांना फक्त माणसं दिसतात
आणि त्यांना खाण्याचे वेड लागते



माणसांना कळत नाहीये
कि या दोघांचं काय करायचं

जीवन्त राहण्यासाठी
शाकाहारी प्राणी
त्यांना परवडतात

मांस देण्यापेक्षा
मेहनतीने तयार केलेले गवत देणे
परवडणारे आहे



शाकाहारी प्राणी फुटतायत
आणि त्यांचे अनेक कळप तयार होतायत

माणसाच्या अंगावरचे गवत कसे खायचे
ह्यावर त्यांच्यात वादविवाद सुरु आहेत
आणि माणसं ह्यातल्या कुणाला गवत खायाला घालायचं
ह्याविषयी कन्फ्युज होतायत



माणसाहारी प्राण्यांना
शाकाहारी प्राण्यांची भांडणं सुखावतायत

खरेतर त्यांना शाकाहारी प्राणीही
खाऊन संपवायचे आहे
पण तूर्तास माणसांची संख्या प्रचंड वाढत असल्याने
त्यांना शाकाहारी प्राणी खाण्याची गरज वाटत नाही

त्यांच्यातले बुजुर्ग सांगतायत कि
शाकाहारी आपापसात लढूनच मरून जातील



शाकाहारी खरोखरच आपापसात लढतायत
प्रत्येक शाकाहारी
दुसऱ्याला तू अँटिक असल्याने
तू पुराणवस्तुसंग्रहालयात दाखल हो असं
तावातावानं सांगतायत

हळूहळू त्यांच्यातली मतभेद एव्हढे तीव्र होतायत
कि ते केव्हाही एकमेकांनाच खायाला सुरवात करतील असं वाटतंय


माणसं असहायपणे
शाकाहारींची युद्धे पाहतायत

गवत तयार करणाऱ्यांचा एक समुदाय आहे
हे त्यांच्या गावीही नाही

त्यांना वाटतंय शाकाहारीशिवाय पर्याय नाही
ती गवत खाणाऱ्या शाकाहारींची वाट पहात बसतात
आणि शाकाहारी गवत खाण्याऐवजी
आता एकमेकाला खाऊन
स्वतःची भूक भागवतायत

माणसे अगतिक आहेत
आणि माणसाहारी माणसे खायाला
आता फक्त आपणच शिल्लक आहोत म्हणून
डिस्को करतायत

---------------------------


मुसीबते मुझे ढुंढतें हुए आती हैं
मैं मुसिबतोंको  सही जगह पहुंचा देता हूँ

मुझे झूठ बोलना नहीं आता तो क्या हुआ
मैं सचकी हर खबर रख़ता हूँ

बदनामीसे डरूंगा तो बिखर जाऊंगा
मैं मेरे बदनमिको गोदमे बिठाता हूँ

मैं नया नया  किरदार पेश नहीं करता
इस युगकी चंचल वास्तविकता पेश करता हूँ

मैं तुम्हे समझमे नहीं आता तो तुम्हारा प्रॉब्लम हैं
मैं जो हूँ जैसा हूँ बस वैसाही गुजरता हूँ

 श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

संघर्ष करायचा नाही फायदा उठवायचा आहे 
प्रत्येक गोष्टीमागे नफा कमवायचा आहे 

आमची पिढी म्हणजे केवळ बोलभांड 
जिला कलई लावून जुना सेट विकायचा आहे 

जिथेतिथे आम्ही मार्केटिंग करतो 
आम्हास अवघा समाज सेल्समन बनवायचा आहे 

भारत राष्ट्र होता आता मार्केट  आहे 
कार्पोरेटसारखा कारभार देशाचा चालवायचा आहे 

राजीव गांधींनी का उगाच संगणक आणला ?
अवघा देशच आम्हांस संगणक बनवायचा आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

दिल्ली १९८४

आयुष्याने घामटे काढली 
लोक म्हणाले फोलपटे काढली 

एका हत्येत शंभर हत्या 
सुडाने माणसांची  सालटे काढली 

तिला सत्तेचा माज होता 
उतरवण्यासाठी मुखवटे   काढली 

त्या दिवशी सोने  वितळले 
मंदिराने जळमटे  काढली 

शेवटी खुन्यांचाही खून झाला 
कारस्थानांनी बाग बनवून तणकटे काढली 

मला भात मिळणार होता 
त्यासाठी मी खरकटे काढली 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )





No comments:

Post a Comment