Sunday, January 17, 2016

शाकाहारी प्राणी



शाकाहारी प्राणी माणसांचे मांस खायाला नकार देत जगतायत

त्यांना माणसाच्या अंगावरचे
रोज उगवणारे गवत चालतं
रोज उगवणारी झाडं चालतात
पण थेट माणूस खाणं पसंद नाही

त्यांना माहित आहे थेट माणूस खाणं
म्हणजे रोज उगवणारे गवत
आणि झाडं नाहीशी करणं

शाकाहारी प्राण्यांच्यात एक सामंजस्य आहे कि
मिळून मिसळून खाऊन
एकमेकाला आधार देत खाऊ



माणसाहारी  प्राणी
माणसं खातायत
आणि त्यांना माणसं खाऊन संपली कि काय खायचं
हा प्रश्न पडत नाहीये

त्यांना फक्त माणसं दिसतात
आणि त्यांना खाण्याचे वेड लागते



माणसांना कळत नाहीये
कि या दोघांचं काय करायचं

जीवन्त राहण्यासाठी
शाकाहारी प्राणी
त्यांना परवडतात

मांस देण्यापेक्षा
मेहनतीने तयार केलेले गवत देणे
परवडणारे आहे



शाकाहारी प्राणी फुटतायत
आणि त्यांचे अनेक कळप तयार होतायत

माणसाच्या अंगावरचे गवत कसे खायचे
ह्यावर त्यांच्यात वादविवाद सुरु आहेत
आणि माणसं ह्यातल्या कुणाला गवत खायाला घालायचं
ह्याविषयी कन्फ्युज होतायत



माणसाहारी प्राण्यांना
शाकाहारी प्राण्यांची भांडणं सुखावतायत

खरेतर त्यांना शाकाहारी प्राणीही
खाऊन संपवायचे आहे
पण तूर्तास माणसांची संख्या प्रचंड वाढत असल्याने
त्यांना शाकाहारी प्राणी खाण्याची गरज वाटत नाही

त्यांच्यातले बुजुर्ग सांगतायत कि
शाकाहारी आपापसात लढूनच मरून जातील



शाकाहारी खरोखरच आपापसात लढतायत
प्रत्येक शाकाहारी
दुसऱ्याला तू अँटिक असल्याने
तू पुराणवस्तुसंग्रहालयात दाखल हो असं
तावातावानं सांगतायत

हळूहळू त्यांच्यातली मतभेद एव्हढे तीव्र होतायत
कि ते केव्हाही एकमेकांनाच खायाला सुरवात करतील असं वाटतंय


माणसं असहायपणे
शाकाहारींची युद्धे पाहतायत

गवत तयार करणाऱ्यांचा एक समुदाय आहे
हे त्यांच्या गावीही नाही

त्यांना वाटतंय शाकाहारीशिवाय पर्याय नाही
ती गवत खाणाऱ्या शाकाहारींची वाट पहात बसतात
आणि शाकाहारी गवत खाण्याऐवजी
आता एकमेकाला खाऊन
स्वतःची भूक भागवतायत

माणसे अगतिक आहेत
आणि माणसाहारी माणसे खायाला
आता फक्त आपणच शिल्लक आहोत म्हणून
डिस्को करतायत

---------------------------


मुसीबते मुझे ढुंढतें हुए आती हैं
मैं मुसिबतोंको  सही जगह पहुंचा देता हूँ

मुझे झूठ बोलना नहीं आता तो क्या हुआ
मैं सचकी हर खबर रख़ता हूँ

बदनामीसे डरूंगा तो बिखर जाऊंगा
मैं मेरे बदनमिको गोदमे बिठाता हूँ

मैं नया नया  किरदार पेश नहीं करता
इस युगकी चंचल वास्तविकता पेश करता हूँ

मैं तुम्हे समझमे नहीं आता तो तुम्हारा प्रॉब्लम हैं
मैं जो हूँ जैसा हूँ बस वैसाही गुजरता हूँ

 श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

संघर्ष करायचा नाही फायदा उठवायचा आहे 
प्रत्येक गोष्टीमागे नफा कमवायचा आहे 

आमची पिढी म्हणजे केवळ बोलभांड 
जिला कलई लावून जुना सेट विकायचा आहे 

जिथेतिथे आम्ही मार्केटिंग करतो 
आम्हास अवघा समाज सेल्समन बनवायचा आहे 

भारत राष्ट्र होता आता मार्केट  आहे 
कार्पोरेटसारखा कारभार देशाचा चालवायचा आहे 

राजीव गांधींनी का उगाच संगणक आणला ?
अवघा देशच आम्हांस संगणक बनवायचा आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

दिल्ली १९८४

आयुष्याने घामटे काढली 
लोक म्हणाले फोलपटे काढली 

एका हत्येत शंभर हत्या 
सुडाने माणसांची  सालटे काढली 

तिला सत्तेचा माज होता 
उतरवण्यासाठी मुखवटे   काढली 

त्या दिवशी सोने  वितळले 
मंदिराने जळमटे  काढली 

शेवटी खुन्यांचाही खून झाला 
कारस्थानांनी बाग बनवून तणकटे काढली 

मला भात मिळणार होता 
त्यासाठी मी खरकटे काढली 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )





Friday, January 15, 2016

एका
भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२



षंढधर शून्यराम अस्तित्वे 


''डोक्यावर आहे खुंटी मारल्यागत स्वर्ग 
पायाखाली अजाण जमीन 
मी श्रीधर शांताराम तिळवे 
उर्फ षंढधर शून्यराम अस्तित्वे 
बाहेर जायचं का ?''
''राजू , फिरून ये जरा ''
''काय घरात पडलायस भूकेसारखा ?''
''इथं सर्वच जातीधर्मवासियांना 
प्रवेश मिळेल हां ''
''टेबलावर साली जगाची धूळ ''
''दोन भजी एक चहा आण ''
''साला प्रत्येकाचं लाईफ कांदाभजीसारखं 
एक भजी दुसऱ्या भजीसारख नाही ''
''रेडिओवर रफी चौदहवी का चांद 
गळ्यातून ओततोय चहात ,चहा प्या ''
'' लताचा गंधार म्हणजे …. ''
'' भीमसेन जोशींचा निषाद म्हणजे …''
''च्यायला !''
''भूखको साला मारती हैं आँतको ठण्डा करती हैं 
अगर ये चाय  होती तो भूखे कहाँ जाते ?''
''हमभी फरमाते हैँ ''
''नाम ?''
''राजू दयेन्द्र ''
''फरमाईये ''
''सूर्यामध्ये आयुष्याचे कितने दिन मर  गये 
काळाचे किती हत्ती आतड्यातून गुजर गये ''
''व्वा !''
'' जाने उसकी कितनोने मारी 
फिरभी कहती हैं मैं हुं कुंवारी ''
श्शी !
''मैने जो डाला उसमे थोडासा पानी 
कहने लगी हाय ! मेरी गयी रे जवानी ''
''अश्लील ! अश्लील !''
''वास्तववाद !''
''फुस्स !''
'' The life is the greatest joke 
and wife is the best entertainment ''
''साली दहा रुपये दिल्याशिवाय 
देत नाही मारायला बायको असून ''
'' स्त्रीमुक्तीची वाटचाल … ''
'' स्त्रीची चाल बघा मग वाटचाल …… ''
'' श्री काही सुचत का ?''
''हाथमे रुमाल लेकर रही हैं वोह 
जाने किसके कफ़नकी तैयारी हैं ये ''
''व्वा !''
'' और एक ''
'' चली गयी वो कुछ खुदको संभलकर कुछ हमे बदलकर 
हम तो खडे रहे थे जैसे जिंदगी जा रही थी अपनी ''
'' इंग्रजी रद्द झालीच पाहिजे ''
''इंग्रजी लावणी ऐकणार का ?''
''या रावजीची चाल लावायची ''
''oh my dear , come here 
I 'll give my love ,
love , love , love , 
please come in my , please come 
in my ,  come in my cave 
Oh My dear …. ''
'' आपुन साला जाणार कुठ ?''
''बॉर्न सर्टिफिकेटपासून डेथ सर्टिफिकेटपर्यन्त ''
''श्री बीए तरी नीट कर ''
'' एकच प्यालाची वाट लावली वरदन ''
'' गडकऱ्यान्च्या प्यालाला शांति लाभू दे ''
''अमिताभचा एक डायलॉग ,
मेरे ज़ख्म जल्दी नहीं भरते ''
'' संजीवने खल्लास किया रे त्रिशूलमे ''
''एकदम खल्लास ''
'' ह्या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे ''
'' श्शी ! कुठ काय  लिहितात कार्टी ?''
''होतीच ना ही कोरी पाटी ?
आम्हीच भरली ती अंधारान …. ''
'' लोकसंख्येचा प्रश्न …''
'' युवक एकता झिंदाबाद ! ''
'' मी बिस्मिल्ला खान ऐकणार आहे आज ''
''इंदिरा गांधीकी जय ''
''तुमच्या …. च्या पुच्चीची जय  रांडेच्यानो ''
'' दम मारो दम….  ''
'' जन गण मन …… ''
'' हरे राम हरे कृष्ण …. ''
''झीनतच्या मांड्या …. ''
'' विझत चालली साली कम्युनिस्ट क्रांतीसारखी …. ''
'' स्त्रीमुक्ती ……. ''
''पाणी !पाणी !''
''आनंदयात्री गावा गाणी ''
''खुर्चीच आमची तुमची राणी ''
''तत्वज्ञान आवश्यक …… ''
'' संशयवादी होतो लोक मृत्युनंतर म्हणाले 
ईश्वराला मृतात्म्याकडून शांती मिळू दे ''
'' व्वा तिळवे ! कुठून उचललात हो ?''
''गंगे , परसाकडला माझी पाळी हाय सांगून ठेवते …''
''तुमबिन जाऊ कहा दुनियामे आके … ''
''गंगे , आली पाळी …''
'' कुछ  ना फिर चाहा सनम तुमको चाहके … ''
'' म्युनिसिपालटीचा मुडदा बशिवला ह्या …. ''
'' पाणीबी वहात नाय नळातन … ''
''काय रे ही इंडिया ?''
'' घाम फुट्या साला … ''
'' अनुप जलोटाची चांद अंगडाइया लावा जरा ''
'' कथेला जाम विषय ''
'' मॉडर्न पेंटिंग … ''
''कागदावर मुता दोन मिंट 
जे तयार होईल ते मॉडर्न पेंटिंग ''
'' आन्तरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होण्यासाठी 
अलिप्तता राष्ट्रांची ………''
'' टै टै टै .......  ''
'' मी म्हणते रडवी पोर आणावीत कशाला ?''
''कवी का ?''
''हैलो , हैलो
हरवलेले शब्द एका योनीत सापडले 
झवा आणि घेवून जा ''
'' हैल्लो , जपत जावा शेठजी 
साखरेचा भाव तुमच्या प्रकृतिवर ''
''भगवा झेंडा पडला ... ''
'' लाल हजर आहे ''
'' लाल पडला ..... ''
'' भगवा हजर आहे ''
'' hello डार्लिंग … ''
'' निरोध विसरलात ना ?
किसेस घ्या फक्त . कुटुंब नियोजन आहे . ''
'' संभोगातून समाधी हा भगवान …''
'' बॉल काय आहेत रे ? बाप रे बाप ! …. ''
''अक्षरश : हिमालय ठेवल्यासारखा वाटतोय ''
'' हिमालयातील संन्यासी लोकांनी … ''
'' विसंगतीतून सुसंगतीकडे जाण्याचा 
मानवाचा सनातन प्रयत्न आहे हे मिस्टर …… ''
''कुठला रांडेचा बोलला हा … ''
हुश्श !


शून्य !
शून्य !
शून्याबाहेर शून्य
शून्यात शून्य
शून्यही शून्य
पू  
र्ण   
वि  
रा

श्रीधर तिळवे -नाईक
-----------------------------------------------------------
बेन्जामिन मोलाईज ह्या कवीला आता जवळ जवळ सर्वच लोक विसरून गेले असले तरी त्याला फाशी दिली गेली तो दिवस माझ्या आजही लक्षात आहे .१८ ऑक्टोबर १९८५ हा तो काळा दिवस  आत ह्या फाशीविषयी प्रचंड प्रक्षोभ होता . त्या प्रक्षोभाची ही त्या दिवशी लिहिलेली कविता 

कवीला फाशी देताना / श्रीधर तिळवे -नाईक 
कवीला फाशी देताना 
कोणत्या दिवसरात्रींची वेळापत्रक मांडलीत तुम्ही ?
कसे धजावला वर्तमानपत्रांच्या रंगमंचावर 
भिंतींची सामुहिक नृत्ये सादर करायला ?

तुम्हाला माहीत नाही का 
कवीला फाशी दिल्याने शब्द मरत नाहीत ते !


मूर्खांनो ,
ते आता अधिकच झपाट्तील बोधीवरील मुन्जाने 
वाढवतील आपल्या वयाचा वेग 
जोडतील अक्षरांच्या रथांना आपल्या फुफ्फुसाचे पंचतारांकित अश्व 
भरतील बाळाच्या अंगाईत ओठांचे युद्धशंख 
देतील चिमुकल्या डोळ्यांना आपल्या गगनवेधी दुर्बिणी 
आणि येतील एक दिवस तुमच्या राजदंडावर 
आपल्या पावलात माणसांचा जमाव घेवून 


काय करणार आहात तेव्हा ?
कुठे जाणार आहात ?
परदेशात ?
आकाशात ?
पाताळात ?

कुठेही जा 
शब्द सर्वत्र हजर असतील 

शब्दांपासून पळून जाण  एवढ  सोपं नसत 
कवीला मृत्युदंड देण्याइतकं तर नसतच नसत 

ह्यापुढे सर्वत्र शब्द तुमचा पाठलाग करतील 
मृत्यूच्या उत्खनलेल्या शहरात तुम्हाला घेराव घालतील 


सिद्ध करतील 
कवीला फाशी देवून शब्द मरत नसतात 
कवीच्या आत्म्याला अंगावर चढवून 
ते वावरत असतात 


आता तुम्ही कुठेही जा 
तुमचा 
मृत्यू 
निश्चित आहे 





माझ्या साऱ्या कविता 
शब्द मुळातच असतात परके अर्थही  अनोळखी बनत जातात. 
तरीही माझ्या साऱ्या कविता माझ्याच दिशेने प्रवास करीत असतात 

लिहीलं काय न लिहिलं काय, केलं काय अन न केलं काय 
आज पसारा, उद्या पाचोळा, जगलो काय अन मेलो काय 
मी काय, माझं अस्तित्व काय, सारे काही जाणीत असतात 
माझ्या कविता माझ्याच दिशेने तरीही प्रवास करीत असतात 

कोठून आलो, कोठे जाणार, गेलो तरी काय जाणणार 
जगलो तरी काय होणार, झाले तरी कुठवर टिकणार 
सवाल  सारे  ओळखीचेच, पण आयुष्य अनोळखी करीत जातात 
माझ्या कविता माझ्याच दिशेने तरीही प्रवास करीत असतात 


जात टाळून
तुम्ही उच्चवर्णीय असा किंवा शूद्र 
जात टाळून जगताच येत नाही या देशात 

अनंत तुकड़े करून अंथरा तुमचा देह 
तुमच्या जिभेच्या एका पेशीवरून सहज शोधून काढतील ते तुमचे ब्राम्हणत्व 
आईवरून शिवी दिली 
आणि जरा ढकललं  छातीचं  मडकं  
की फुप्फुसात पचकन थुंकुन ते विचारतील 
क्षत्रिय? मराठा ! खरं ना ?
डोळ्यांच्या तागड़या करून समोरच्या माणसाचं मांस 
एका नजरेत तुम्हाला तोलता आलं  नाही तर दचकू नका 
तुमच्या चलनी नोटांच्या हाताळणीवरुन तुम्हाला ते सहज ओळखतील. 
पुटपुटतील, वैश्य असेच वागायचे !
तुमची  विजातीय त्वचा कितीही उजाळा पृथ्वीच्या सहाणेवर 
तुमच्या घामावरून ते रुमालत जातील आणि किंचाळतील 
'' शुद्र ना ? कायम कळकट कायम कटकट ''
कितीही झाका तुम्ही ओठांचे लिंग सभ्यपणाच्या लंगोटयाने 
ते तुमच्या घरात येतील 
एकेका नातेवाईकाचा चेहेरा डोळ्यांवर भाजून घेतील 
आणि हसत म्हणतील
बी. सि.  . . . . . . . पण वाटत नव्हता नय ?  

तुम्ही उच्चवर्णीय असा वा शुद्र 
जात टाळून जगाताच येत नाही या देशात 

लोकमान्य टिळकांवर तुम्ही चांगलं  बोललात 
तर शुद्राच्या पोटातून बाहेर पडेल हिरोशिमा अणुबॉम्ब  चाटत 
उठेल मराठ्यांच्या नागड्या कपाळावर नपुंसकं शस्त्राची आठी 
कराल घोष शाहू महाराजांचा 
तर ब्राम्हणत्वाच्या  ढुंगणातून हगु लागतील शब्द 
पेटवाल म. गांधीचा नैतिक यज्ञ 
तर उफाळेल बेबींतून एक तागडी 
आणि भारताच्या नकाशात बांधून देशील ते भारतातले नद्या पर्वत 
फुलवाल दगडफुलातून फुल्यांनी दिलेले गुलाब 
तर रातोरात जाळतील तुमच्या बागा पारंपारिक आगीने 
बाबासाहेबांचे नावही उच्चाराल 
तर मेंदूच्या काळोखातून सात आंधळे बाहेर पडतील हत्ती शोधत 
दाखवतील  अंगठा 
आणि करतील अदृश्य इतिहासाची भूखंडे  स्वतः त अदृश्य होत

तुम्ही उच्चवर्णीय असा किंवा शुद्र 
तुम्ही माणूस नाही आहात यावर साऱ्यांचंच एकमत झालंय. 


सारच नाकारून चालणार नाही 

सारच नाकारून चालणार नाही, काहीतरी इथलंही स्वीकारावंच लागेल 
सारंच विध्वंसनीय असू कसं शकतं? कुठतरी स्वतःलाही आवरावंच लागेल

कुठलीही संस्कृती नसते संपूर्ण टाकाऊ, कुठलाही श्वास नसतो संपूर्ण मृत 
असतात आपलेही पूर्वज, ज्यांनी विष पिळून असतं काढलेलं अ'मृत'
अमृताचा त्या  इथं वारसा सांगतच आपल्याला या मृतांत वावरावं लागेल 

कितीही फाटका आभाळदेह तरी विजेची सुई असते आधीच शोधलेली 
कितीही गंजली पृथ्वीची योनी तरी विर्यनाळ असते आधीच झपाटलेली 
गोळीच घालायची असेल आपणास तर नाळेलाच बंदुकीसारखं वापरावं लागेल 
सारंच नाकारून चालणार नाही काहीतरी स्वीकारावंच लागेल 

आपल्याही आधी असतं जन्मलेलं गर्भाशय, 
आपल्याही आधी असतात लढणारे सैनिक
आपल्याही आधी असतो शस्त्रांचा खणखणाट, 
आपल्याही आधी असतं रक्ताचं पीक 

कणसांनी त्यांच्या पुष्ट होऊन इथं आपल्यालाही आपलं शास्त्र नांगरावं लागेल. 
सारंच नाकारून चालणार नाही काहीतरी इथलंही स्वीकारावंच लागेल. 

 देव बुडाले तेव्हा 

दंगल झाली तेव्हा 
काडी पेटत होती 
शहर फुप्फुसात 
सिगारेट धुमसत होती 

लष्करी जमावात
नागरिक रडत होते 
कोरी होती तरीही
ती डायरी खाजगी होती 

बसताना पोलीसगाडीत 
मला इतकेच कळत होते 
देव बुडाले तेव्हा 
उदबत्ती हाती होती. 

आपली काही नैतिक हरकत 
पितामह, 
चालले आहे लिंग माझे कुमारी …शी संभोग करायला बहरून 
आपली काही नैतिक हरकत बाप म्हणून, बाप म्हणून?

तुम्ही म्हणाल लग्न करावं, मग पाळावा शरीरधर्म 
आपली संस्कृती आत्मीय आहे, जपायला हवे तिचे वर्म 

पण पितामह, 
तुम्ही सांगा, संभोग आणि लग्न यांचा संबंध काय?
काय? आहे  जसा गोठा आणि जशी गाय
तुमची व्याख्या, लग्न म्हणजे संभोगाची तडजोड म्हणून 
आम्हास मात्र हवा संभोग शरीराचा हक्क म्हणून 
तेव्हा सॉरी पितामह पटत नाही,
तुम्हीच सांगा किती काळ ठेऊ मी मला आवरून 
चालले आहे लिंग माझे कुमारीशी संभोग करायला बहरून. 

तिची सम्मती आहे का, प्रश्न किती काळ विचारणार 
भरात आली जवानी की अहो प्रत्येक योनी दवारणार 
हरकत घेतली तर सांगेन संभोग सामाजिक नसतो म्हणून 
देईन पटवून-इतिहास खणून. भुगोलच जिवंत राहतो म्हणून 

तेव्हा सॉरी पितामह,
देतो खात्री,
संभोगाआधी थारारेल पण ती जाणार नाही अगदीच बावरून 
चालले आहे लिंग माझे कुमारीशी संभोग करायला बहरून 

आपली काही नैतिक हरकत बाप म्हणून बाप म्हणून?

चंद्र दर एकोणतीस दिवसांनी 
१ 
चंद्र दर एकोणतीस  दिवसांनी 
आत्महत्या का करतो 
ह्या गहन प्रश्नावर विचार करत होता तो 
त्याला तसे पाहून 
दिवसाने किरणाच्या काड्या कानात घालून
त्याला जागं केलं 
म्हणाला पोरगी  शोधायला सुरवात कर 


त्यानं  वक्षाच्या बाजारात 
वक्षाच्या भावाची चौकशी केली 
कळालं- 
एका वृषणात दोन वक्ष आरामात मिळतात 
वृषण आणि कंपनीच्या एका शेअरची किंमत 
दहा तोळे सोनं आणि दोन्हीकडचा खर्च होती. 
थोडक्यात 
वृषणातील निसर्ग नोटात हिंडत होता. 
रुपयासाठी माणूस लग्नमंडपात भांडत होता. 


एक कॉलेज 
तिथं ती भेटली 
तिनं आभाळाच्या फडक्यानं 
त्याची पापणी पुसली 
आणि ओर्डर दिली 
लक्षावधी सुर्य, हजारो पौर्णिमा आणि एक प्रेमपत्र 


ती आणि तो 
त्यांनी चित्रपट पहिले 
नातेवाईकांवर चर्चा केली 
तो बोअर झाला 
ती बोअर झाली 
तिने आपल्या श्वासांचे शर्ट  घालावयास दिले 
त्यांनं घरी येऊन पहिले 
शर्ट फारच आखूड होत होते. 


तर रात्री 
संभोगासारख्या निघून जात होत्या. 
फॅमिली रूम. 
तो म्हणाला, 
गुणसूत्रे झिंदाबाद 
ती म्हणाली,
महालग्न आणि दोन पोरं झिंदाबाद 
तो म्हणाला, 
समाज झिंदाबाद 
ती म्हणाली,
ताज झिंदाबाद 
तो म्हणाला 
नीती झिंदाबाद 
ती  म्हणाली 
तडजोड झिंदाबाद 
तो म्हणाला, 
मग फूट 
ती म्हणाली 
फुटते 
मग त्यांनी ऑर्डर दिली,
दोन स्पेशल मृत्यू 
चहात घालून 
साखर जरा जास्त 
मग ते थोडे थोडे फुटले 


तिने लग्नपत्रिका हातात दिली 
त्याने लग्नपत्रिका पायात घेतली 
त्यांनी त्या अक्षता हातावर दिल्या 
त्याने अक्षता डोक्यावर टाकल्या 
तिने सात पावलं टाकली 
तो सूर्याच्या आरामखुर्चीत चिरूट ओढत बसला 
ते म्हणाले 
रेकॉर्डरूम सांभाळा 
तो म्हणाला, 
मुकेश तलत लावेन 
ते म्हणाले, 
राव ! लग्नप्रसंग आहे रफी किशोर लावा 
मग त्याने श्रीकृष्ण वासुदेव यादव यांना फोन केला 
चंद्राची रेकोर्ड मागवली 
रेकोर्ड वाजत राहिली 
वाजत राहिली 
वाजतच राहिली 
कविता म्हणून 
गाजत राहिली 
गाजत राहिली 
गाजतच राहिली 


नंतर बरोबर एकोणतीस दिवसांनी तो 
वेश्यागृहात सापडला 
शेअर्सची खरेदी विक्री चालूच होती. 


मुलींनो 
मुलींनो वयात येऊ नका 
आपल्या योनीतील सूरवंटाची फुलपाखरं होऊ देऊ नका 

निष्पापपणे संभोग करावेत इतके मुक्त नाहीत इथले आसमंत 
शिकवलेलंही नाही इथल्या योद्ध्यांना नीरोधची कवचकुंडलं कशी वापरावीत ते 

तेव्हा एक चूक - एक संभोग 
एक संभोग     - एक अपत्य 
एक अपत्य     - सह्स्रभर अन्न,
                       शतकभर वस्त्र 
                       आणि दशकभर निवारा 
हे सारंच इथल्या दुष्काळी प्रदेशाला परवडायचं नाही 

म्हणून म्हणतो मुलींनो, कृपया 
वयात येऊ नका 
आपल्या योनीतील सूरवंटाची फुलपाखरं होऊ देऊ नका. 


मी केवळ स्वतःत रमू शकत नाही 
सॉरी 
मी केवळ स्वतःत रमू शकत नाही 
सॉरी 

मलाही आवडतात ह्या नद्या, हे पहाड, हे आकाश, हे वृक्ष, ही फुले 
हा मातीचा समुद्र, ही समुद्राची माती 
मलाही ऐकू येतो तुमच्याप्रमाणेच 
अज्ञात झऱ्याचा पावा. 

मलाही वाटतं बासरीतून सात सूर  उचलून 
आभाळाच्या एकेका डोळ्यात भरावे एकेक 
समॄद्ध  इंद्रधनुष्य  
मीही रमतो जाणिवेचे स्तर, प्रस्तर उलगडण्यात 
अंतरीक्षाचे अबोल संभाषण ऐकण्यात 
पृथ्वीच्या गर्भात हालणाऱ्या मुलांच्या  
हातापायांचे आवाज ऐकण्यात 

पण सॉरी 
मी केवळ त्यातच रमू शकत नाही 
गर्भाशयात नाळेने मला घातलेली भुकेची शपथ 
मी विसरू शकत नाही 

वडिलांच्या आसवांत गवसलेला आतड्याचा दोरखंड '
मी तोडू शकत नाही 
आईची गजरा विकताना झालेली जीवघेणी परवड मी फेकू शकत नाही.  

खरं असेल 
तुमच्या मतानुसार मी भ्रष्ट झालो असेन 
माझ्या मूळ पिंडापासून पतित झालो असेन 
पण सॉरी 
मी स्वतःत रमू शकत नाही. 
लिंगाची ओळख झाली तरी 
संभोगासाठी प्रतीक्षा वाळत घालणाऱ्या 
युवक युवतींना पाहून 
भरून येते माझे मन. 
अन्न,वस्त्र,निवारा 
अवनीच्या भूगर्भात सापडलेले तीन ब्रह्य शब्द 
जेव्हा माणूस खात भटकतात 
दशदिशांच्या नाळेतून 
तेव्हा गलवलुन येत मला. 


तुम्ही बाहेर वळाल?
वळा 
इथल्या एकेका अन्नाच्या दाण्याची ओळख पटण्यासाठी 
बुद्धालाही द्यावे लागतील करुणेचे संदेश शतकशतकभर. 
उपनिषदांच्या सशक्त तुकड्यांना 
वस्त्रासाठी झालेली परवड पाहून परिशिष्ट जोडावे लगेल.
अपरीग्रहपालनासाठी तपस्या नागवी होऊन करावी म्हणून. 
आकाशात कोणी बाप खरोखरच असेल तर 
येशूला जन्म देण्यासाठी 
त्याला करावा लागेल मेरीशी संभोग फुटपाथवर घर मिळत नसल्याने. 

हे आणि असे कित्येक  सत्याचे बिंदू 
ह्या वर्तुळात भटकत असतील तर त्यांना 
सांगताही येणार नाही 
या वर्तुळाचा आरंभ कुठला,  मध्य कुठला आणि अंत कुठला ते. 

म्हणून म्हणतो- 
मी केवळ आत वळू शकत नाही. 

ह्या वर्तुळाच्या बिन्दुबिन्दुवर असलेले 
भिंतीचे भीतीदायक काफिले 
पुसून टाकण्याचे सामर्थ्य मला कमवायचे आहे 
उद्दालकापासून मार्क्सपर्यंत साऱ्यांच सनातनी थडगे 
अंतराळात ढकलायचे आहे. 

तेव्हा 
तुम्ही मला श्रद्धांजली वाहून मोकळे होऊ शकता 
त्याने मी मारणार नाही 
कारण 
शब्दांत स्वतःचा प्राण लपवण्याचा मूर्खपणा 
केवळ तुम्हीच करू शकता. 


तुम्ही कलावंत असाल तर . . . . . . . 
तुम्ही कलावंत असाल 
तर कृपया मला भेटू नका

असतील 
साऱ्या सृजनाच्या खिडक्या 
तुमच्या घरांनाच जोडलेल्या असतील 
तुमचा प्रत्तेक श्वास 
एक नव्हे, दोन नव्हे, चांगला दहा मैल धावत असेल 
पण का कुणास ठाऊक 
मला तरी तुमच्या सत्यशोधत 
आत्ममाग्नतेच्याच रेश्या अधिक गवसल्यात 
खरं सांगू
तुम्ही जेव्हा म्हणता 
जसा मी प्रत्यक्षात आहे तसाच मी शब्दात आहे 
तेव्हा मी हसतो 
खरंतर युद्धाचे नियम आणि खेळ्या 
तुम्हाला माहित नसतात
रंभूमिचा आकारही नीट पहात नाही तुम्ही 
तरीही तुमच्या गप्पा खिलाdu वृत्तीवर 
 तुमचे खाजगी चेहरे  पाहताना 
कितीवेळा तरी माझे डोळे आत्महत्याच करतात 
तुम्ही रडता तेव्हा तर मला आधिकच  हसू येत 
खरेतर तुमच्यात काहीच नसत 
आणि तरीही सूर्य खाजगी खिश्यात टाकून हिंडण्याच्या
गप्पा तुम्ही मारता
अन दिवसाला झालेली जखम  तुमचं  रक्त पिऊन
अधिकच पुष्ट होते

किती मुखवटे असतात तुमचे
बायका, मित्र, घर
किती स्वार्थी असता तुम्ही यांच्याबाबत
स्वत : च्या अधिकाराचे पाषण   उंचावत
किती सहजपणे  निर्माण करता तुम्ही व्यवस्थारोग
आणि आत जमलेल्या रुग्णांना पाहून तुम्ही म्हणता
या माझ्या कलाकृती आहेत
त्यावेळी अन्तरिक्षांनी सोडलेले नि:श्वास
फक्त क्षितीजाच्या  कानांनाच ऐकू येतात
पण तुम्हाला त्याची जाणीवही नसते

रंग, सूर, शब्द, मुद्रा
ठीक आहे
तुम्ही फक्त त्यावरच बोला
त्यापलीकडे असलेले अन्नाचे भोग
वस्त्रापासून झालेले साथीचे रोग
आणि निवारा नाही म्हणून रस्त्यावर होणारे  संभोग
तुम्ही पाहू शकणार नाही
कारण तुमचे दोन्ही डोळे
विसंगतीच्या पट्ट्या लावून स्वतःत झोपी गेलेत
आणि तुमचे सारे अश्रू
तुमच्या कलाकृतीच्या पायाशी मारून पडलेत

तेव्हा कृपया मला भेटू नका
माझ्या घरांच्या खिडक्या सृजनासाठी खुल्या नाहीत
आणि
माझ्या दारातून फक्त उपाशी माणूसच आत येऊ शकतो.


माझ्या मृत्युनंतर 
ह्याची भूक
त्याची भूक
भूक तशी एकच असते
हृदयातील
खोलवरची
जखम तशी नेकच असते
दीड   पटवून द्या

माझ्या मृत्युनंतर

क्रांती भुकेने पेटते
पण शब्दांनी पटवावी लागते
तेव्हा बावीस फुटांची अक्षरलिपी
सहज आकलनासाठी तयार करा.

माझ्या मृत्युनंतर


एकेक आतड आहे एक एक अक्षर

































































श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित